पुणे : काँग्रेस सरकारने केलेल्या योजनांच्या प्रचारासाठी स्थापन केलेल्या योजना संनियंत्रण समितीचे आज पुनरुज्जीवन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, ‘समितीच्या सदस्यांनी आता पुन्हा सक्रिय होण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने ७० वर्षात देशाची बांधणी केली. सत्तेचा वापर नेहमीच सर्वसामान्य नागरिकांसाठी केला. भारतीय जनता पक्ष मोदी सरकारच्या माध्यमातून हे सगळे मोडीत काढत आहे. काँग्रेसने कष्टाने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार मोडायलाच नाही तर लुटायला निघाले आहे. भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी जनसेवक होऊन जनतेला द्यावी.’
दरम्यान, देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करून हेरगिरी केली जात आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सहकारी, इतर विरोधी पक्षांचे नेते यांचीही हेरगिरी करण्यात आलेली आहे.
संविधानाने दिलेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावरचा हा हल्ला तर आहेच परंतु लोकशाही मुल्याच्या मुळावरच घाव घातलेला आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून काँग्रेसने गुरुवारी राज्यपालांना भेटून निवेदन दिले. या निवेदनात हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची राजनाथसिंह यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा


