🕒 1 min read
मुंबई : कोकणात आलेल्या पूर परिस्थितीने सगळेच हादरले आहेत. कोकणात ढगफुटीमुळे पावसाने थैमान घातलं आहे. रायगडच्या तळीये गावात आज दरड कोसळून ३६ लोकांचा जीव गेला आहे. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवेदना व्यक्त केल्यात. ‘राज्यात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
त्यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ‘पाऊस मोठा आहे, संकट मोठे आहे, परंतु प्रयत्न थिटे आणि नेतृत्व खुजे आहे. अतिवृष्टीची व्याख्या बदलावी लागेल असे मुख्यमंत्री म्हणतायत. त्यांनीही वर्षभर घरी बसून मुख्यमंत्रिपदाची व्याख्या बदललीच आहे की..’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, जीवितहानी होऊ नये यासाठी प्राधान्य असणार आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहे. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे लागणार आहे. त्याचवेळी लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे’ असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
तळई गावात दरड कोसळून 32 जणांना मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. महाड तालुक्यातील नाते रोडवरील तळई गावात दरड कोसळली. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 32 घरांवर ही दरड कोसळली असून त्यात 72 जण बेपत्ता असल्याची माहिती होती. त्यातच, सध्याच्या माहितीनुसार या दुर्घटनेत 32 जणांना मृत्यू झाल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले’, काँग्रेसचा हल्लाबोल
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
