🕒 1 min read
अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. महाड तालुक्यातील नाते रोडवरील तळई गावात दरड कोसळली. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३२ घरांवर ही दरड कोसळली असून त्यात ७२ जण बेपत्ता असल्याची माहिती होती. त्यातच, सध्याच्या माहितीनुसार या दुर्घटनेत ३२ जणांना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून आणि पुरामुळे जनजीवन विस्तळीत झाले आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळांवर जात नसल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. ‘नैसर्गिक अपत्तीच्या काळात राजकारण नको, हातात हात घालू काम केले पाहिजे, हे मान्य आहे. आम्ही त्यासाठी हात द्यायला तयार आहोत, पण सरकारचा हात तर दिसू द्या.’
‘सध्या राज्यात पूर परिस्थिती गंभीर बनली असताना मुख्यमंत्री ठाकरे घरात बसून आहेत. त्यांचे मंत्रीही कोठे मदतीला धावले दिसत नाहीत. आम्हाला मात्र राजकारण करू नका म्हणतात’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते आज अहमदननगरला पक्षाच्या बैठकीसाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पाटील म्हणाले, ‘२०१९ साली कोल्हापूर, सातारा, सांगली भागात गंभीर पूर परिस्थती बनली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, मी महसूलमंत्री होतो. मी आणि देवेंद्र फडणवीस डायरेक्ट फिल्डमध्ये होतो. त्यावेळी आम्ही ४ लाख ७३ हजार लोकांना पुरातून बाहेर काढले होते. सुमारे पंधरा दिवस लोकांचा निवारा, अन्न आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय केली होती. हेलिकॉप्टर, बोटीच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो होतो. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. तरीही काँग्रेसने आमच्यावर टीका केली.’
सध्या राज्यातभयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वर्षभर घरी बसून ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची व्याख्या बदललीच आहे की..’ भाजपचा टोला
- ‘काँग्रेसने मेहनतीने बांधलेला देश मोदी सरकार लुटायला निघाले’, काँग्रेसचा हल्लाबोल
- रायगडमध्ये दरडीखाली 80-85 लोक दबल्याची भीती,19 तासानंतरही मदत नाही
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
