🕒 1 min read
मुंबई : देशात कोरोना संकट वाढत असतानाच केरळ, पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणूक पार पडल्या होत्या. यानंतर, आज मतमोजणी पार पडत असून निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे दिग्गज नेते मैदानात उतरले होते.
दरम्यान, आता निकाल जाहीर होत असून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यांनी कडवी लढत दिली आहे. यामुळे भाजपने मागील निवडणुकांपेक्षा मोठी मुसंडी मारली असली तरी दोन अंकी जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. यामुळे अमित शाह यांनी केलेला सत्तास्थापनेचा दावा अपुरा राहिल्यामुळे शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.
आता भाजप नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी भाजपवर टीका करणाऱ्या नेत्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपाने आसाम, पुदुच्चेरी जिंकले… पश्चिम बंगाल दिदींनी राखले आमच्या जागा, मतदानाची टक्केवारी वाढली काँग्रेसची देशभरात दाणादाण उडाली.! ज्यांचे तिकडे नामोनिशाण सुद्धा नाही त्यांची इथे पिपाण्या वाजवायची घाई! महाराष्ट्रात यांनी विश्वास गमावला पंढरपूरात विठोबा म्हणूनच आम्हाला पावला!’ असा घणाघात आशिष शेलार यांनी केला आहे.
भाजपाने आसाम, पुदुच्चेरी जिंकले
पश्चिम बंगाल दिदींनी राखले
आमच्या जागा, मतदानाची टक्केवारी वाढली
काँग्रेसची देशभरात दाणादाण उडाली.!ज्यांचे तिकडे नामोनिशाण सुद्धा नाही
त्यांची इथे पिपाण्या वाजवायची घाई!महाराष्ट्रात यांनी विश्वास गमावला
पंढरपूरात विठोबा म्हणूनच आम्हाला पावला!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 2, 2021
पंढरपुरात राष्ट्रवादीचा जिव्हारी लागणारा पराभव तर भाजपचा विजय !
अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. ३७१६ मतांच्या आघाडीने समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणारच पण… , पंढरपूर विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
- बंगालचे निकाल समोर येताच अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- जयंत पाटलांनी सांगितलं राष्ट्रवादीला जिव्हारी लागणाऱ्या पंढरपूरच्या पराभवाचं कारण, म्हणाले…
- केरळात राष्ट्रवादीचा डंका; २ जागांवर दणदणीत विजय !
- ‘अजितदादा तुम्ही दिवस मोजायला लागा; फडणवीसाहेबांनी ठरवलेल्या करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात झालीये !’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

