Share

शहीद जवान सुनील काळे यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी

Published On: 

सोलापूर : पुलवामा येथील अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या सुनिल काळे यांच्या कुटुंबातील एकाला शिक्षणानुसार शासकीय सेवेत घेण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पानगाव (ता.बार्शी) येथे शहीद काळे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन देशमुख, टोपे, भरणे यांनी आज सांत्वन केले.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार सर्वश्री राजेंद्र राऊत, संजय शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

शहीद काळे यांची भाची वर्षा काळे यांनी कुटुंबाबाबत माहिती दिली. काळे कुटुंबीय जिरायती शेतीवर अवलंबून आहे. मामीला आधार देण्यासाठी कोणी नाही, एकाला शासकीय सेवेत घेण्याची तिने मागणी केली होती.

यावर देशमुख म्हणाले, आम्हाला शहीद काळे यांचा अभिमान आहे. शासन खंबीरपणे कुटुंबाच्या पाठिशी आहे. वीर जवानाचा आम्हाला अभिमान असून काळे कुटुंबाला लागेल ती मदत शासन करेल, असे भरणे यांनी आश्वस्त केले.

शासकीय मदतीबरोबरच खास बाब म्हणून काळे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत घेण्याचा प्रयत्न शासन करेल. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी शहीद जवान सुनील काळे यांच्या आई कुसुम काळे, पत्नी अर्चना, मुले श्री आणि आयुष, भाऊ नंदकुमार आणि किरण काळे उपस्थित होते.

कोरोनाशी झुंजत असताना पंकजाताईने फोन केल्याच्या आनंद झाला, धनुभाऊ झाले भावूक

…अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – पालकमंत्री संजय राठोड

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी होणार पोलीस अधिकारी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!