Share

कोरोनाशी झुंजत असताना पंकजाताईने फोन केल्याच्या आनंद झाला, धनुभाऊ झाले भावूक

Published On: 

परळी : माझ्या आजारपणाच्या काळात पंकजा ताईने फोन केला आणि सदिच्छा दिल्या, याचा आनंद वाटला, अशी भावनिक प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली. ‘एबीपी माझा’शी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या आहेत.

धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळताच पंकजा यांनी तातडीनं त्यांना फोन केला होता. बंधू तब्येतीची काळजी घे आणि लवकर बरा होऊन घरी ये, अशा सदिच्छा पंकजा यांनी दिल्या होत्या. यावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. आमच्यात संघर्ष झाला होता. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. असं असतानाही बहिणीचा फोन आल्याचा आनंद झाला, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

धनगर आरक्षण समितीचा आमदार पडळकरांना दणका, घेतला हा निर्णय…

दरम्यान, धनंजय मुंडे हे करोनावर मात करून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या ते आपल्या घरी क्वारंटाइन आहेत. मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या काळातल्या आठवणींना उजाळा देतांना ते म्हणाले, हा कसोटीचा काळ होता. त्या काळात पंकजा मुंडे यांनी फोन करून मला धीर दिला. त्यांचे 4, 5 वेळा फोन आले होते. पंकजांनी फोन केल्याने आनंद वाटल्याच धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

अवघड काळात असा धीर महत्त्वाचा असतो. मला काहीच होणार नाही हा आत्मविश्वास मला नडला. या काळात सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. या कठीण काळात आईने धीर दिला. मुलींनी समजून घेतलं त्यामुळे आणखी बळ मिळालं. अशा काळात आत्मविश्वास ठेवला पाहिजे. अस देखील मुंडे म्हणाले.

शरद पवारांशी पंगा घेणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या अडचणीत आणखी वाढ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!