मुंबई : वेस्टइंडीज मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताने इंग्लंडचा पराभव करून विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद मिळवले आहे. यश धूलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला आणि विक्रमी ५ वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक उंचावला. पण याच विश्वचषकानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे.
१९ वर्षांखालील अफगाणिस्तानच्या संघातील चार खेळाडूंनी त्यांच्या देशात परतण्यास नकार दिला आहे. वेस्टइंडीज मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडकानंतर अफगाणिस्थान संघामधील ४ खेळाडूंनी मायदेशात परतण्यास नकार दिला आहे. या निर्णयामुळे क्रिकेट जगतात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे १९ वर्षांखालील ४ अफगाणिस्थानचे खेळाडू मायदेशात परत जाण्याऐवजी इंग्लंड देशात पोहचले आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात मायदेशात परतण्यास नकार दिला आहे.अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वृत्तानुसार, हे चार खेळाडू सध्या लंडनमध्ये असून त्यांचा व्हिसा 8 फेब्रुवारीला संपणार आहे.
गेल्या वर्षी अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आल्यानंतर माजी राष्ट्रपती, नोकरशहा, खेळाडू आणि नागरिकांसह दहा लाखांहून अधिक अफगाण नागरिकांनी तात्काळ देश सोडला आहे त्यातच या खेळाडूंनीही मायदेशात न परतण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल’; चंद्रकांत पाटलांचा टोला
-
किरीट सोमय्या यांचे आम्ही पुणे महानगरपालिकेत जंगी स्वागत करणार, भाजप पधाधिकाऱ्याची घोषणा…
- “शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून…”; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ टीकेला विखे पाटलांचे प्रत्युत्तर
- ‘मोदींच्या ‘या’ कार्यक्रमामुळेच देशात कोरोना पसरला’; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
-
शोएब अख्तरची याने सांगितली लता मंगेशकर यांच्या बरोबरची एक आठवण…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
