Share

“शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून…”; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ टीकेला विखे पाटलांचे प्रत्युत्तर

Published On: 

अहमदनगर: चार दिवसांपूर्वी संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सत्रात अनेक दिग्गज नेत्यांनी आपली मते मांडली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपले मत मांडले. त्यात त्यांनी ‘खाल्ल्या मिठला जागावे’ अशी मराठीत म्हण म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटील जागले नाहीत, असा टोला लगावला होता.

सुजय विखे आणि सुप्रिया सुळे दोघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. सुप्रिया सुळे यांनी सुजत विखे पाटील खाल्ल्या मिठाला जागले नाहीत, ते त्यांचा इतिहास विसरले असे त्यांना सुनावले होते.

याच व्यक्तव्याला उत्तर देत आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुनी एक गोष्ट सांगत सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला. त्यांनी म्हटले, “ज्या राजीव गांधींनी शरद पवार यांना कॉँग्रेस मध्ये घेतले, त्याच शरद पवारांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केले, त्यांनी कॉँग्रेसच्या आणि राजीव गांधींच्या पाठीत खंजीर खुपसत आपला स्वतंत्र पक्ष तयार केला, हे सुप्रिया सुळे विसारल्या का?”

“शरद पवार यांना काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद दिले होते. त्यांनी १० जून १९९९ साली राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष स्थापन करून कॉँग्रेसला राम राम ठोकला होता”, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!