Share

‘राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल’; चंद्रकांत पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे: सध्या आता पुणे महापालिकेच्या निवडणुका (PMC Elections) जवळ येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजप पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज पुण्याजवळ मांजरी येथे पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुणे महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा वापर करून महानगरपालिकेत नव्याने काही गावांचा समावेश केला आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ झालेले मतदार गावांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपलाच मते मिळतील, असं पाटील यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यात प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणात मोडतोड केली असली तरी भाजपचा मतदार सर्वत्र कायमच आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक भाजप पूर्ण बहुमताने जिंकेल, असा विश्वास देखील पाटील यांनी दाखवला. तसेच पुणे महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) स्वप्नाचा चक्काचूर होईल, असा टोला देखील पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!