पुणे: संजय राऊत यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी लोकसभा खासदार किरीट सोमय्या पुणे शहरात आले असताना पुण्यातील शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, त्यावेळी किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या भवनात पायऱ्यांवर पडून जखमी झाले होते. किरीट सोमय्या पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना भेटावयास गेले असता शिवसैनिकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला,त्यात त्यांना जखमही झाली.
भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्या सर्वांना जामीन मंजूर झाला आहे. किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यासंबंधी दोषींवर कडक कारवाई केली जावी या करता पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पुणे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आज पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे निवेदन दिले.
या भेटीनंतर नंतर बोलताना पुणे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी म्हंटले कि, ” भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी महापालिकेत ज्या पायरीवर हल्ला झाला, त्याच ठिकाणी येत्या शुक्रवारी ११ तारखेला ४ वाजता किरीट सोमय्या यांचं जंगी स्वागत करून, पुष्पहार घालणार आहोत आणि त्यांचे जंगी स्वागत करणार आहोत. याबाबतीत जगदीश मुळीक अधिक माहिती देताना म्हणाले कि, ” किरीट सोमय्या यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्या संबंधी आम्ही पुणे पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र पुणे पोलिसांनी त्यावर कोणतीच दखल न घेता राजकीय दबावापोटी कोणतीच कारवाई केली नाही. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून असाप्रकार पुन्हा घडू नये म्हणून आम्ही केंद्रीय गृहविभागाकडे याबाबत तक्रार देखील केली आहे”.
महत्वाच्या बातम्या :
- ‘मोदींच्या ‘या’ कार्यक्रमामुळेच देशात कोरोना पसरला’; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
शोएब अख्तरची याने सांगितली लता मंगेशकर यांच्या बरोबरची एक आठवण…
- ‘अजित पवारांनी आयुष्यभर जमीनी लाटण्याचं काम केलं’; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
लता मंगेशकर सावरकरांना मानणाऱ्या होत्या म्हणून त्यांचा अपमान होतो आहे का ?
- मुंडे बंधू – भगिनीमधील वाद पुन्हा शिगेला, धनंजय मुंडे म्हणाले कि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

