मुंबई: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. यावेळी बोलताना देशात कोरोना विषाणू पासरवण्यासाठी कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप देखील मोदींनी लावला आहे. यावर राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
महाराष्ट्रातील मजुरांना काँग्रेसने (Congress) स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांना मोफत तिकिटे दिली, असा आरोप मोदींनी केला. काँग्रेसने यावर जोरदार आक्षेप घेतल नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यातच राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी राज्याच्या अस्मितेला धक्का देणारे वक्तव्य केले. कोरोना पसरवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दोषी ठरवले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण देशात ९ फेब्रुवारी २०२० रोजी आढळला. गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रमामुळे लॉकडाऊन करण्यास उशिरा झाला, त्यामुळे देशात कोरोना पसरला, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. कोरोना गुजरातमध्ये आला आणि तो ट्रम्प यांनी आणला, असा दावाही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
शोएब अख्तरची याने सांगितली लता मंगेशकर यांच्या बरोबरची एक आठवण…
‘अजित पवारांनी आयुष्यभर जमीनी लाटण्याचं काम केलं’; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
लता मंगेशकर सावरकरांना मानणाऱ्या होत्या म्हणून त्यांचा अपमान होतो आहे का ?
मुंडे बंधू – भगिनीमधील वाद पुन्हा शिगेला, धनंजय मुंडे म्हणाले कि…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

