🕒 1 min read
नागपूर : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला. दरम्यान,गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे मुंबईत जल्लोषात स्वागत झाल्यानंतर ते आज (१७ मार्च) नागपूरमध्ये दाखल झाले आहे. यावेळी बोलत असतांना महाराष्ट्रात २०२४ ला पूर्ण बहुमताचं भाजप सरकार पहायला मिळेल, असा दावा फडणवीसांनी केला.
यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती आहे. महाराष्ट्रातही तीच स्थिती आहे.’ तसेच राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी काही म्हटलं तर लगेच सरकार पडणार अशा चर्चा सुरु होतात,असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, फडणवीस नागपूरमध्ये दाखल होताच त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. तद्पश्चात विमानतळापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरापर्यंत आता रॅली काढण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “काश्मीर फाईल्समधील कागद फडफडून दाखवू नका”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक अनुदानात होणार वाढ!
- “आता देश बदलत आहेत…” The Kashmir Files वर विवेक अग्नीहोत्रीची प्रतिक्रिया
- तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच- राम कदम
- IPL 2022: “तो स्वतःला जॅक कॅलिस समजतोय” हार्दिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर क्रिकेटरसिक संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
