मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या सतत खूप चर्चेत आहे. या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित आणि हिंदूंच्या नरसंहाराची कथा दाखवण्यात आली आहे. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी धक्कादायक घटना उत्तम पद्धतीने पडद्यावर आणल्या आहेत, ज्या पाहिल्यानंतर लोक थक्क झाले. निर्माते अभिषेक अग्रवाल, दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासह ‘द काश्मीर फाइल्स’च्या टीमने शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पीएम मोदींनी चित्रपटाचे कौतुक केले.
काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची कथा
चित्रपटाची कथा 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या हत्याकांड आणि अन्यायाविषयी आहे. ज्यात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पंतप्रधानांसोबतच्या भेटीविषयी विवेक अग्नीहोत्री यांनी ट्विट केलं आहे.
विवेक अग्नीहोत्री यांचं ट्विट
ट्विट करत विवेक अग्नीहोत्री यांनी निर्माते अभिषेक अग्रवाल यांचे कौतुक केले आहे. मला फार आनंद होत आहे की तुम्ही भारतातील सर्वात आव्हानात्मक गोष्टीचं निर्माण केले आहे. या सिनेमाचं परदेशी स्क्रिनिगं झाल्याबद्दल आनंद असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :


