नवी दिल्ली : ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सध्या राजकारणातही चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे. तसेच या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगितली.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे पहिले नेते होते ज्यांनी अमरनाथ यात्रा उधळण्याची धमकी देणाऱ्या दहशतवाद्यांना जर एकाच्याही केसाला हात लागला तर हजला जाणारी विमाने उडू देणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर अमरनाथ यात्रा सुरळीत पार पडली होती’, असे राऊतांनी सांगितले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘त्याकाळी बाळासाहेब ठाकरेंनी काश्मिरी पंडितांची बाजू घेऊन परखड भूमिका स्पष्ट केली होती. काश्मिरी पंडितांना रक्षणासाठी हातात शस्त्र द्या हे सांगणारे तेच होते. त्यावेळी त्यांना विरोध करणारे भाजपचे नेते होते. त्यामुळे काश्मीर फाईल्समधील कागद फडफडून आम्हाला दाखवू नका’, असेही राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- विरोधकांच्या टीकेवर संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “सत्ता येत नसल्याने…”
- 50 हजार रुपये “या” शेतकऱ्यांना मिळणार; अर्थमंत्री अजित पवारांचा खुलासा!
- IPL 2022: फिटनेस टेस्टचा रिझल्ट आला; हार्दिक पास तर शॉमुळे दिल्लीला लागणार धक्का?!
- तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच- राम कदम
- IPL 2022: “तो स्वतःला जॅक कॅलिस समजतोय” हार्दिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर क्रिकेटरसिक संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

