Share

मुलं पळणाऱ्या टोळीच्या अफवेचं लोन आता राज्याबाहेरही; चेन्नईत दोघांना मारहाण

Published On: 

चेन्नई :  मुलं पळवणारी टोळीच्या अफवेचं लोन आता राज्याबाहेरही पसरलं आहे. ही टोळी मुलं पळऊन नेते व त्यांच्या किडन्या काढते, अशी अफवा काही दिवसांपूर्वी राज्यात पसरली होती . या अफवेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता या अफवेचं लोण राज्याबाहेरही पसरलं आहे चन्नईमध्ये मुलं पळवण्याच्या संशयातून, दोघांना मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झालेत.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन पाच जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता चेन्नईमध्येही असेच प्रकरण समोर आले आहे. मुलं पळवणारे असल्याच्या संशयातून संतप्त जमावानं दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघंही गंभीररित्या जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघंही चेन्नई मेट्रोमध्ये मजुरीचं काम करणारे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून व्हिडीओ फुटेजच्या आधारे दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

धुळे हत्याकांड : गृहराज्यमंत्र्यांनी फोडले सोशल मिडीयावर खापर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!