Share

धुळे हत्याकांड : गृहराज्यमंत्र्यांनी फोडले सोशल मिडीयावर खापर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- मुलं पळविणाऱ्या  टोळींच्या अफवेनेमुळे जमावाने केलेल्या मारहाणीत धुळ्यात ५ जणांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शोक व्यक्त केला आहे.संशय आला तर व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे, त्यांना मारहाण करणे चुकीचे असल्याची त्यांनी म्हटलं आहे.

राज्यातील विविध भागात मुलं पळविणाऱ्या टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण आहे. यातूनच मारहाणीच्या घटनाही घडत आहे. अशीच एक घटना धुळ्यातील साक्री तालुक्यात घडली आहे. यात जमावाने केलेल्या मारहाणीत ५ जण ठार झाले आहेत. महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत. सोशल मीडियावरुन घटना व्हायरल होतात, त्याचा हा परिणाम आहे. हे थांबवण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. राईनपाडा या आदिवासी पाड्यावर घटना घडली. अचानक घटना घडल्यास त्यावर दुर्गम आदिवासी भागात कारवाई करण्यात अडचणी येतात. उद्या धुळे दौऱ्यात भेट देणार असून त्यावेळी माहिती घेईल. मात्र, कायदा कोणीही हातात घेऊ नये असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

साक्री तालुक्यातील राइनपाडा या गावात ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी बाजाराच्या ठिकाणी एका टेम्पोमधून काही लोक आले होते. सुरुवातीला स्थानिक लोकांना ही मुले पळवणारी टोळी असल्याचा समज झाला. त्यानंतर सर्वत्र ही अफवा पसरली त्यामुळे या व्यक्तींभोवती जमाव वाढत गेला आणि त्यांनी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेक काळ बेदम मारहाण केल्याने अखेर यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त आणि आक्रमक झालेल्या जमावामुळे काही वेळातच या व्यक्तींचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून कोणतीही शहानिशा न करता केवळ अफवेमुळे बेदम मारहाण करणारे लोक कोण होते. यांचा तपास ते घेत आहेत, असे सुत्रांकडून कळते.

मृतांपैकी काहीजण सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळते. धुळे जिल्ह्यात पहिल्या पावसानंतर शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक शेतमजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. मृत्यू झालेले लोकही मजूरच असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप त्यांची ओळख स्पष्ट झालेली नाही.

चेंबूरमध्ये अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू

मी भारतात परतलो तर लोक मला मारून टाकतील – मेहुल चोक्सी

मांजरावरील वादातून महिलेचा खून

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!