Share

‘मन झालं बाजिंद’ झी मराठीची नवी प्रेमकहाणी, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : झी मराठी नेहमी प्रेक्षकाच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या ढंगाच्या मालिका घेऊन येत असते. यात काही प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. यातील अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या आहे. आता झी मराठी आणखी एक प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.

‘मन झालं बजिंद’ असे या मालिकेचे नाव आहे. राया आणि कृष्णाची ही प्रेमकथा अभिनेता वैभव चव्हान आणि अभिनेत्री श्वेता राजन यांच्या प्रमुख भूमिकेतील ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेम म्हणलं की रंग आठवतो तो गुलाबी. मात्र या प्रेमकथेचा रंग हा पिवळा दाखवण्यात आला आहे. राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण या मालिकेच्या प्रोमोत दाखवली जात आहे.

https://www.instagram.com/p/CR3KlxtDNtV/

‘तुझ्या एका भेटीसाठी जिव उधळुन देतो मी बाजिंदा रंगाच आभाळ पांघरुन घेतो मी’ अशा संवादासह या मालिकेच्या प्रोमोत वैभव आणि श्वेता झेंडुच्या फुलांच्या अवतीभोवती दिसत आहे. यापुर्वी तुझ्यात जीव रंगला, लागीर झालं जी यासारख्या प्रेमकथा घेऊन आलेल्या झी मराठीची ही नवीकोरी प्रेमकथा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडणार आहे. अनिकेत साने यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!