🕒 1 min read
मुंबई : देशात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. तसेच सर्वसामान्याप्रमाणेच लोककलावंत आणि रंगभूमी कलाकारांना देखील कोरोनाचा फटका बसला आहे.
सध्या देशात हळू हळू काही निर्बंध शिथिल करण्यात येत आहे. चित्रीकरणाला देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र रंगभूमीला अद्याप काही परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे कलाकारां पुढे चिंता निर्माण झाली आहे. यासाठी अनेक भागात आंदोलन देखील करण्यात येत आहे. मात्र अद्याप तरी यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. याच बाबत आता अभिनेत्री मेघा घाडगेने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
https://www.facebook.com/megha.ghadge.7/posts/4293202054096079
आमच्या हक्काचे व्यासपीठ जर नेतेमंडळी त्यांच्या प्रचारासाठी वापरत असतील तर आम्ही आता गप्प बसणार नाहीत, असा इशारा रंगभूमी कलाकारांनी दिला आहे. कलावंतांचे अस्तित्व टिकवून राहण्यासाठी आता हे कलाकार महाराष्ट्रभर रंगकर्मी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला अभिनेत्री मेघा घाडगे हिने पाठिंबा दर्शवला आहे.
फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, एक काळ होता, अगदीच तुटपुंज्या पाकिटावर समाधानी होणारे आम्ही. अलीकडे मायबाप रसिक प्रेक्षकांच्या तो टाळ्यांचा आवाज कानी ऐकू येत नाही. अनुभवी मार्गदर्शकाची ती पाठीवरची पडलेली थाप गेला काही काळ हरवून गेली आहे. तिसरी घंटा ऐकायची आहे. पण तीच घंटा आज धूळ खात पडली आहे. मायबाप सरकारला एक विनवणी करतो, राजकारण्यांचे कार्यक्रम आमच्या नाट्यगृहात करता. आणि आम्ही कलाकार मात्र आमच्या घरात शिरायचे नाही, हा कोणता कायदा. आम्हाला भीक नको, काम करायचे आहे.
‘आम्हाला आनंद तेव्हा मिळतो जेव्हा प्रेक्षक आमच्या कामाच्या मोबदल्यात टाळ्यांचा वर्षाव करतो. आम्ही सुखी तेव्हा दिसतो. जेव्हा आमच्या कामातून प्रबोधन होते,आज या महामारीच्या काळात सगळ्यांना सवलती दिल्या आहेत. गरिबांना जेवण, श्रीमंतांना वर्क फ्रॉम होम, घरकाम करणारे, माताडी कामगारांना,रिक्षा चालकांना सगळ्यांना एक आई सारखे आपण आपल्या पदराखाली जागा दिली. मग आम्ही काय पाप केले. या मातीशी आम्ही प्रामाणिक आहोत. या महाराष्ट्राची संस्कृती सातासमुद्रा पलीकडे घेऊन गेलो.’
तर पुढे मेघा म्हणाली, ‘तुमच्या ही कामात हक्काने आम्हाला बोलावता. मग तो प्रचारासाठी असो वा सेलिब्रिटी म्हणून.त्या तुझ्याच लेकराला विसरलास. आता तूच आमच्याशी अस वागणार तर आम्ही कोणाकडे पाहायचे. म्हणून तुला आमची आठवण करून देण्यासाठी,आमचं अस्तित्व टिकुन राहावे म्हणून, आम्ही आंदोलन करतो आहे. रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र जागर रंगकर्मींचा उदो उदो.’ असे म्हणत तिने रंगकर्मी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निवड आपलीच आहे जंगलाचा राजा हवा की…,शरद पवारांचा सवाल
- पदार्पण करताच पडिक्कलचा खास विक्रम ; ठरला पहिलाचं भारतीय फलंदाज
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
