Share

पूरग्रस्तांना एमआयडीसीचा मदतीचा हाथ- सुभाष देसाई

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट कोसळले आहे. महापूर, दरड दुर्घटनेत अनेकांनी जेव गमावला आहे. आता कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे २५ हजार पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने जीवनावश्यक वस्तुंची मदत रवाना करण्यात आली आहे. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मदतीचा पुढाकार घेतला आहे.पूरग्रस्तांना एमआयडीसीद्वारे अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशिट, टॉवेल, अन्नपदार्थ यांचा समावेश आहे. याशिवाय पाच ट्रकद्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. ज्या गावांना एमआय़डीसीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तेथील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद, नाशिक आदी प्रादेशिक कार्यालयांकडून ही मदत देण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली एमआयडीसीकडून १००० राशनचे पाकिटे, दोन हजार पाण्याच्या बाटल्या,५५०० चादरी तसेच टॉवेल्स पाठविण्यात आले आहे. तर औरंगाबादमधून ५०० अन्नधान्यांची पाकिटे पाठविण्यात आली आहेत.या भागातील सुमारे २५ हजार कुटुंबियांना एमआयडीसीच्यावतीने मदत दिला जात आहे. पुढील दोन दिवसांत मदतीचे वाटप केले जाणार आहे. शासनदेखील पूरग्रस्तासोबत असल्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.

दरम्यान पूरग्रस्त भागासाठी एमआयडीसीकडून ही मोठी मदत करण्यात आली असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!