🕒 1 min read
मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी देखील अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. गंभीर पुरस्थितीमुळे शेती, व्यापार यांच्यासह घरादाराचे मोठे नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ यानंतर राज्यात झालेली अतिवृष्टी आणि पुन्हा या वर्षी देखील तौक्ते चक्रीवादळ आणि अतिवृष्टी यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असून केंद्राने देखील मोठा हातभार लावावा अशी मागणी राज्य सरकारद्वारे केली जात आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यानंतर मदतीसाठी केंद्रीय पथकाने पाहणी करून पंचनामे केले. शेतकरी वर्ग पुन्हा एकदा मोठ्या संकटात असताना वर्षाच्या कालावधीने केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींचे पॅकेज जाहीर केले असून भाजप नेत्यांनी याचे स्वागत केले आहे तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी ही मदत तुटपुंजी व उशिरा केली गेल्याची टीका केली आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील ट्विटरद्वारे केंद्र सरकारवर दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. ‘राज्यात जुन ते ऑक्टोबर २०२० दरम्यान मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत केंद्राने आता जुलै अखेर घोषित केली. ३७२१ कोटी रुपयांच्या मदतीची राज्यातील शेतकऱ्यांना गरज असताना घोषित झालेली ७०० कोटींची मदत ही तुटपुंजी आहे,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
तौक्ते चक्रीवादळानंतर मा.पंतप्रधानांनी गुजरातचा तत्काळ दौरा करून दुसऱ्याच दिवशी १००० कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशातील दोन राज्य असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतीवृष्टी नुकसानीची मदत एक वर्षानंतर का ? आणि ती सुद्धा तुटपुंजी?
(2/3)— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 29, 2021
पुढे वडेट्टीवार यांनी, ‘तौक्ते चक्रीवादळानंतर मा.पंतप्रधानांनी गुजरातचा तत्काळ दौरा करून दुसऱ्याच दिवशी १००० कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशातील दोन राज्य असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतीवृष्टी नुकसानीची मदत एक वर्षानंतर का ? आणि ती सुद्धा तुटपुंजी? ढगफुटी व दरड कोसळण्याच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मोठी वित्त व प्राणहानी झाली आहे. महाराष्ट्र अश्या मोठ्या संकटाला तोंड देत असताना नरेंद्र मोदींनी सुद्धा जो न्याय गुजरातला तोच न्याय महाराष्ट्राला ही भावना ठेऊन नुकसानग्रस्त कोकणचा दौरा करावा,’ अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पवना धरण ८५ टक्के भरले; विसर्ग सुरु होणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- पवना धरण ८५ टक्के भरले; विसर्ग सुरु होणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ठाकरे सरकारची बदनामी केल्याच्या आरोपातून एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन; भाजपने केली ‘ही’ मागणी
- शिखर धवनने दुसर्या टी -20 सामन्यात कोहलीचा विक्रम मोडत घेतली अव्वल स्थानी झेप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
