Share

वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात थोडं खरं बोलायला शिका; अमृता फडणवीसांचा पुन्हा प्रहार

Published On: 

मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावे, असे भाई जगताप यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनच अमृता फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर भाईंनी यावर खोचक प्रतिक्रिया दिला आहे. त्यामुळे, अमृता यांनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे.

अमृता यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना ‘खरं किती टोचतं हे अमृता फडणवीस यांच्या भाषेवरून समोर आलं, मी केवळ सवाल केला होता’, अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली. भाई जगताप यांच्या या प्रतिक्रियेनंतर अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा भाईंना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुले यांच्यात आता शाब्दिक युदध रंगले आहे. अमृता यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये २००५ सालचा म्हणजे आघाडी सरकारच्या काळातला आदेशच पुरावा दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हंटले आहे की , जेव्हा आपण खरे असतो तेव्हा खोटे ऐकून ऐकून खराब वाटत- हे भाई जगतापला कसे कळणार?. वयाने, अनुभवाने, संपत्तीने एवढे मोठे आहात. थोडं तर खरं बोलायला शिका ! असा टोलाही अमृता यांनी लगावला आहे. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातला म्हणजेच तुमच्याच काळातला २००५ चा विशिष्ट आदेश बघा. आता तरी चूक कबूल करुन गप बसा! अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!