लातूर : रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार सध्या लातूरकरांना पाहायला मिळत आहे. लातूरकरांसाठी महत्वाची समजलय जाणारी हैद्राबाद- हडपसर रेल्वे कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लातूरकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. प्रवाशांचे मत लक्षात न घेता केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
ही रेल्वे मराठवाड्यासाठी महत्वाची मानल्या जाते. या रेल्वेला आठवड्यातून तीन दिवस चालवण्याचा निर्णय या अगोदर रेल्वे विभागाने घेतला होता. पण अचानक हा निर्णय रद्द करून रेल्वे विभागाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचे प्रवाश्यांकडून बोलले जात आहे. येणाऱ्या काळात रेल्वे विभाग या निर्णयाचा फेर विचार करेल अशी अपेक्षा केली जात आहे.
हैद्राबाद- हडपसर रेल्वे अचानक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम प्रवाश्याना १ एप्रिल पासून होणार आहे. या निर्णय विरोधात सध्या नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. हा निर्णय तात्काळ परत घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रेल्वे प्रशासन या हा निर्णय बदलेल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे. जर हा निर्णय रेल्वेने बदलला नाही, तर लोक प्रतिनिधींनी दाखल घ्यावी अशी ही मागणी होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आणखीन एक बदली प्रकरण, औरंगाबादच्या निलंबित कारागृह अधीक्षकाने मागितले इच्छामरण
- आठवडी बाजारात होतेय ‘कोरोना’ची विक्री?
- अब्दुल कलाम जिहादी, मुस्लीम हे कधीच भारत समर्थक असू शकत नाहीत; नरसिंहानंद सरस्वती बरळले
- आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा
- उमरगा पालिकेत पावणेदोन कोटींचा घोटाळा करणारा मास्टरमाईंड अटकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

