नवी दिल्ली – भारताचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे येत्या २३ एप्रिलला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीला अजून एक महिना बाकी आहे. त्यामुळे बोबडे यांच्यानंतर सरन्यायाधीश कोण याची चर्चा सुरु झाली आहे. यासंबंधी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी१९ मार्चला सरन्यायाधीश बोबडे यांना पत्र लिहून उत्तराधिकाऱी कोण याबाबत माहिती मागवली होती.
कायदामंत्री निवृत्त होणाऱ्या सरन्यायाधीशांकडे पुढील CJI बद्दल सल्ला मागतात. या मुद्द्यावरुन पंतप्रधानांसोबत चर्चा होते आणि त्यानंतर राष्ट्रपती नव्या सरन्यायाधीशांची घोषणा करतात. नागपूरमध्ये जन्मलेल्या बोबडे यांनी १८ नोव्हेंबर २०१९ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून पद सांभाळले होते. आता १७ महिने सेवा दिल्यानंतर ते पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत.
सरन्यायाधीश बोबडे यांनी बुधवारी त्यांचा उत्तराधिकारी कोण असावा याबाबत शिफारस केली आहे. न्यायाधीश एन व्ही रामण्णा यांचे नाव त्यांनी सुचवले आहे. याबाबतचे पत्र केंद्र सरकारकडे पाठवले आहे. एन व्ही रामण्णा हे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांनंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. रमण्णा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला असून त्यांची सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्यानंतर २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे.
एन व्ही रामण्णा यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात २००० पर्यंत प्रॅक्टिस केलं. त्यानंतर २०१३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तिथं तीन महिने काम केल्यानंतर रामण्णा यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. पुढच्या महिन्यात २४ एप्रिलला रामण्णा यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली तर त्यानंतर १६ महिने त्यांचा कार्यकाळ असेल. २०१८ मध्ये माजी सरन्याधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधातील अभियोग, आमदार लाच प्रकरणात राजकारण इत्यादी प्रकरणात रामण्णा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- उमरगा पालिकेत पावणेदोन कोटींचा घोटाळा करणारा मास्टरमाईंड अटकेत
- पराभवानंतर इंग्लंडला आणखी एक मोठा झटका ; कर्णधार मॉर्गन आणि ‘या’ फलंदाजाच्या खेळण्यावर शंका
- जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार का दिला ?
- बीड जिल्हा दहा दिवसांसाठी लॉकडाऊन
- ‘स्त्रीचा अपमान करतो त्याचा विनाश निश्चित ; इतिहास साक्ष आहे रावणाचं…’


