Share

‘या’ गावात मिळणार पाच रुपयात २० लिटर पाणी !

Published On: 

जालना: जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात अवघडराव सावंगी गाव आहे. या गावाची लोकसंख्या पाच हजारच्या आसपास. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल पाहता गावातील ग्रामपंचायतीने आरओ प्लँट उभारून पाच रुपयांत वीस लिटर पाणी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे गावात ‘अच्छे दिन’ आले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही.

अवघडराव सावंगी येथे नुकतेच पंचायत समिती निधीतील तीन लाख रुपये खर्च करून आरओ प्लँट सुरू करण्यात आला. याचे उद्घाटन भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. गावात एखादा सामाजिक, धार्मिक किंवा लग्न सोहळा असला की, इतर ठिकाणाहून शुद्ध पाणी आणावे लागायचे. त्यामुळे त्या ठिकाणी ग्रामस्थांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होता. तसेच गावात शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात विविध आजार बळावत होते. त्यामुळे आरओ प्लँटची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समितीचे उपसभापती सुखलाल बोडके यांच्याकडे केली होती. त्यानुसार पंचायत समिती निधीतून तीन लाख रुपयांचा निधी या प्लँट फिल्टरसाठी मंजूर करून घेतला होता.

केवळ पाच रुपयांत ग्रामस्थांना वीस लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांची शुद्ध पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता आपण आमदार संतोष दानवे यांच्याकडे पाठपुरावा करीत पंचायत समिती निधीतून तीन लाख रुपये मंजूर करून आरओ प्लँटची उभारणी केली आहे. गावातील लोकांना पाच रुपयांत वीस लिटर पाणी मिळणार आहे. ग्रामस्थांनी देखील पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे. कारण पाणी हे जीवन आहे. अशी माहिती पंचायत समितीचे उपसभापती सुखलाल बोडके यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!