पुणे : औरंगाबाद कारागृहातील आरोपींनी आपल्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या, मात्र त्याबाबत चौकशी न करताच तडकाफडकी माझ्यावर निलंबन कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आपणास वेळोवेळी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने औरंगाबाद कारागृहाचे निलंबित अधीक्षक हिरालाल जाधव यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपल्यावर कशा प्रकारे चुकीची कारवाई झाली याची माहिती पाठवली आहे.
पोलीस दलातील बदल्यांवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरलेले असतानाच आता सरकारच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. तडकाफडकमी बदली झाल्याने नाराज झालेल्या कारागृह अधीक्षकाने इच्छा मरणाची मागणी केली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत जाधव म्हणाले, ८ मे २०२० रोजी नोटिफिकेशनद्वारे कोरोनाकाळात मी औरंगाबाद कारागृहातील ३३७ पात्र कैदी कारागृहातून सोडले होते. यात कोणत्याही अपात्र कैद्याचा समावेश नव्हता. मात्र, कारागृहातील बलात्कार, पोस्को गुन्ह्यातील आरोपींनी कुणाच्या तरी सांगण्यावरून माझ्याविरोधात न्यायालयात तक्रार दिली. त्यानुसार एडीजी कार्यालयाने गृहमंत्रालयास अहवाल दिला आणि २२ फेब्रुवारी २०२१ रोजी माझे अचानक निलंबन करण्यात आले. माझ्यावरील आरोपांबाबत चौकशी होणे गरजेचे होते, सीसीटीव्ही तपासणी करणे, पुरावे गोळा करणे महत्त्वाचे होते मात्र कोणतीही शहानिशा न करताच माझ्यावर कारवाई करण्यात आली. माझ्या सेवानिवृत्तीस केवळ अडीच महिने कालावधी शिल्लक असताना सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आहेत. फडणवीस यांनी थेट केंद्रीय गृहसचिवांकडे याप्रकरणाची तक्रार करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सरकारभोवती संकटाचं हे वादळ घोंगावत असतानाच कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी इच्छा मरणाची मागणी केली आहे. तडकाफडकी बदली करण्यात आल्याने जाधव नाराज असून त्यांनी कारण नसताना बदली होत असेल तर मला इच्छा मरण द्यावे, असं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- बीड जिल्हा दहा दिवसांसाठी लॉकडाऊन
- विराटला अगोदरच आला होता अंदाज, प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज ठरू शकतो
- ‘संघ निवडताना भेदभाव’ ; कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग
- वाढदिवसाच्या आदल्या दिवशी टीम इंडियात स्थान ; कृणालनं शेअर केली भावुक पोस्ट
- ‘भाई जगताप टपोरी आहेत.. त्यांना ‘भाई’ बनायचं होतं,पण…’


