🕒 1 min read
नाशिक : शिवसेना नेते वरुण सरदेसाई आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनंतर याचा वाद चांगलाच पेटल्याच पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर अक्षरश: राडा घातला आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही त्यांनी यावेळी केली आहे.
या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेरचे वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. मात्र, आगामी काळात हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.
नितेश राणे यांनी कोणते आरोप केले होते ?
‘देशात आयपीएलचं आयोजन देशातील नवोदित खेळाडूंना वाव मिळावं यासाठी करण्यात येतं. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजी करणाऱ्यांचं लोकेशन व इतर माहिती असल्याचं सांगत छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या,’ अशी मागणी वाझे करत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय.
‘वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून वरुण सरदेसाई आहेत.’ असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.
पुढे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणं झालं याची माहिती घेण्यात यावी,’ असं आहेत. तसेच, ‘सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
यावरून वरून सरदेसाई यांनी राणे घराण्यावर खोचक टीका केली होती. ‘राणेंच्या घराची पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना माहितच आहे. ते काँग्रेसमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील राणेंवर गंभीर आरोप केले होते. धमकावणे, मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहेत,’ असं टीकास्त्र सरदेसाई यांनी सोडलं आहे.
‘मला राजकीय आवड असल्याने मी या क्षेत्रात आहे. मात्र, माझी राजकीय कारकीर्द संपावी या हेतूने केवळ हे घाणेरडे आरोप नितेश राणेंनी केले आहेत. ते सगळे आरोप तथ्यहीन आहेत. त्यामुळेच मी त्यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहे. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर हे आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत. नाहीतर येत्या ७ दिवसात त्यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं,’ असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; विराटसेनेला मालिकेत आघाडी घेण्याची संधी
- साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक, संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
- …म्हणून उच्चशिक्षित तरुणाने नाकारले भाजपने दिलेले तिकीट
- कॉंग्रेसला तगडा झटका देण्याच्या तयारीत पवार? मातब्बर नेता राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार?
- ‘ऑस्कर २०२१’च्या नामांकनाची घोषणा; प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
