🕒 1 min read
नवी दिल्ली- केरळमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जाणारे पीसी चाको यांनी राजीनामा दिला आहे.चाको यांनी गेल्या आठवड्यात राजीनाम्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, आता पीसी चाको नव्या इनिंगला सुरुवात करणार असून ते आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेष म्हणजे पीसी चाको आज राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांनी कॉंग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकावले आहे. या जेष्ठ नेत्यांनी जी -23 गट स्थापन केला असून आज पीसी चाको गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांचीही भेट घेतील अशी शक्यता आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.
दरम्यान, केरळमध्ये पक्ष दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. तसंच याबद्दल पक्ष नेतृत्वाला दखल घेण्यास सांगून आपण थकलो आहे. केरळ काँग्रेसमध्ये जे काही सुरु आहे, त्याबाबत पक्ष नेतृत्व फक्त बघ्यची भूमिका घेत आहे, अशी खंतही चाको यांनी राजीनामा देताना बोलून दाखवली आहे .
चाको यांनी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. चाको यांनी केरळ काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं. केरळ काँग्रेसमध्ये वर्चस्व गाजवणारे दोन गट आहेत. एका गटाचं प्रतिनिधीत्व माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी हे करतात, तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला हे करतात, असंही चाको यांनी म्हटलं होतं.
पीसी चाको कोण आहेत?
युवक काँग्रेसच्या माध्यमातून चाको यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. चाको हे तब्बल चार वेळा खासदार राहिलेले आहेत. १९६८ मध्ये त्यांची केरळ विद्यार्थी युनियनच्या सचिवपदी निवड झाली होती. त्यानंतर १९७०मध्ये त्यांची केरळ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. १९८० मध्ये चाको केरळ विधानसभेत पोहोचले होते त्यानंतर त्यांनी मंत्रिपद देखील सांभाळले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दडपशाही! शरद पवारांच्या बारामतीला निघण्यापूर्वीच साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक
- शरद पवारांनी अनिल देशमुखांना केले सेफ, डॅमेज कंट्रोल म्हणून परमबीर सिंहांची विकेट पडणार ?
- ‘भाजपला लोक कंटाळले आहेत, काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल’
- प्रवीण अमरे यांना दिल्ली कॅपिटलमध्ये मिळाली ‘ही’ जबाबदारी
- प्रथमेश माने बनला ‘महाराष्ट्रज बेस्ट डान्सर’; प्रेक्षकांचे मानले आभार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
