Share

साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक, संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

Published On: 

औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे गेल्या ५० दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, राज्य सरकार आरक्षणाला गांभिर्याने घेत नसल्यामुळे आंदोलकांनी माजी केंद्रिय मंत्री तथा खा. शरद पवार यांची थेट बारामतीत जाऊन भेट घेण्याचे ठरविले होते. पण ही आरक्षण आक्रोश विनंती रॅली निघण्यापूर्वीच येथील आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे साष्टपिंपळगावमधील संतप्त महिलांनी ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या दुसऱ्या तुकडीला अडवून धरत घोषणाबाजी सुरू केली आहे. यामुळे साष्टपिंपळगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून साष्टपिंपळगावमधील गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आमरण उपोषण मागे घेण्यात आले असले तरीदेखील आंदोलन मागे घेण्यास गावकऱ्यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. मराठा तरुणांकडे गुणवत्ता असूनही आरक्षण नसल्यामुळे तो सुशिक्षित बेकारीत आपले जीवन जगत आहेत. मराठा तरूणांचा आरक्षण विषय निकाली काढण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी साष्टपिंपळगाव ते बारामती अशी ‘आरक्षण आक्रोश विनंती रॅली’ काढून बारामतीमध्ये जाऊन पवार यांच्याकडेच हट्ट धरला जाणार असल्याचे साष्टपिंपळगाव आंदोलकांनी सांगितले होते.

मात्र, बारामतीला प्रस्थान करण्यापूर्वीच आज सकाळी साष्टपिंपळगाव येथील मुख्य आंदोलकांना तहसीलदारांच्या आदेशानंतर बळजबरीने ताब्यात घेण्यात आले. यात मनोज जरांगे पाटील, संजय कटारे, शहादेव औटे, संपत शिंदे, दादासाहेब राक्षे, सुनिल औटे, दादासाहेब बोचरे यांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरुन आम्हाला अटक करत आहात का? असा सवाल यावेळी आंदोलकांची उपस्थित केला. या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर गावातील महिला संतप्त झाल्या असून पोलीस ठाण्याचे गेट लावून घेत महिला आंदेलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!