Share

…म्हणून उच्चशिक्षित तरुणाने नाकारले भाजपने दिलेले तिकीट

Published On: 

मानंतवाडी (केरळ) : विधानसभा निवडणुकीसाठी केरळमध्ये मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसे राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्थानिक नेते तिकीट वाटपामध्ये गुंतले आहेत. या सर्व धामधुमीत एका उच्चशिक्षित तरुणाने भाजपाने दिलेले तिकीट नाकारले आहे.

भाजपाने रविवारी उमेदवारांची यादी जाहीर केली. वायनाड जिल्ह्यातील मानंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा एसटीसाठी राखीव आहे. यात 31 वर्षीय एमबीए झालेले मनीकुट्टन या तरुणाचे पण नाव होते. मनीकुट्टन यांना भाजपने मानंतवाडीमधून विधानसभेच्या आखाड्यात उतरविले होते.

भाजपाने रविवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत मनीकुट्टन यांचेही नाव आले आहे. याबाबत मनीकुट्टन म्हणाले की, ‘ राजकारणात येऊ इच्छित नाही. जेव्हा मी माझे नाव टिव्हीवर पाहिले, तेव्हा मला आर्श्चयाचा धक्का बसला. मला भाजपबाबत खूप आदर आहे, पण मी निवडणूक लढवू इच्छित नाही. मी सर्वसामान्य व्यक्ती असून राजकारणात मला रस नाही. मला नोकरी करायची आहे.

मला राजकारणात यायचे नाही, म्हणून मी हे तिकीट नाकारत आहेत. भाजपाने पनिया समाजातून उमेदवाराची निवड केली, याचा मला आनंद आहे. पण मी निवडणूक लढवू शकत नाही, असे त्यांना मी फोनवर कळविले आहे.’ असे मनीकुट्टन म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!