Share

आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; विराटसेनेला मालिकेत आघाडी घेण्याची संधी

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत-इंग्लंडदरम्यानची टी-20 क्रिकेट मालिका म्हणजे टी-20 क्रिकेट विश्वचषकासाठी संघाची मोर्चेबांधणी सुरू असल्याने नव्या दमाचे खेळाडू स्वतःला सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत. इशान किशनने पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक ठोकून ती झलक दाखवली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना मंगळवारी रंगणार आहे. त्यामुळे इशानसह सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर कशी कामगिरी करणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत.

दरम्यान, ही 5 सामन्याची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन केलं. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न विराटसेनेचा असणार आहे. आतापर्यंत उभय संघात एकूण 16 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मात्र टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे.

भारताला टी 20 रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी उर्वरित सामने जिंकणं बंधनकारक असणार आहे. भारताला अव्वल क्रमांकासाठी ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. यासाठी टीम इंडियाचा हा तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. तसेच अव्वल होण्याच्या दिशेने वाटचाल कायम ठेवण्याचा मानस असेल. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!