🕒 1 min read
पुणे- 2022 च्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 1000 युवकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा संकल्प असून राज्यभरातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यावर काम करत आहेत. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिली.
युवकांना 2022 ला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 1000 युवकांना युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व देण्याचा प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी युवक काँग्रेसचे तळागळातील कार्यकर्ते आजपासूनच कामाला लागलेले आहेत अशी माहिती सुद्धा कपिल ढोके यांनी दिली.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या कॉंग्रेसच्या यादीतून तांबे यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. कॉंग्रेस तर्फे सचिन सावंत,रजनी पाटील,मुजफ्फर हुसेन,अनिरुद्ध वनकर ही चार नावं निश्चित करण्यात आली. यानंतर तांबे काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- यावर्षी भाऊबीजही ऑनलाईनच करा मुंबई महानगरपालिकेचे आदेश
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे देखील मुख्यमंत्र्यांनच्या आवाहनाला समर्थन
- खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा
- न्हावरेतील घटनेचा तपास गांभीर्याने करण्याची आढळराव पाटील यांची मागणी
- दिवाळीत फटाके वाजवण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची अजब नियमावली !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
