मुंबई : राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
ठाकरेंनी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालणार नसल्याचं सांगितलं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवणं टाळावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. कोरोनाचं संकट अजूनही कायम असून दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकत्र येऊन फटाके वाजवल्यास अधिक धोका वाढू शकतो. तसंच प्रदूषण वाढल्यास देखील कोरोना संसर्ग अजून पसरू शकतं. असं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
यानंतर, आज मुंबई महापालिकेने फटाके उडवण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तर, लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य फटाक्यांना परवानगी महापालिकेने दिली आहे. त्यामुळे फक्त लक्ष्मीपूजनाच्या देण्यात आलेली सूट ही अजब आहे. याच दिवशी कोरोना संसर्ग होणार नाही का? किंवा याच दिवशी प्रदूषण होणार नाही का? असे प्रश्न उभे राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोण आला रे कोण आला आरपीआय चा वाघ आला’
- कोल्हापुरातील ‘पाणीपुरी’चं सत्य अखेर उघडकीस! वाचा काय आहे प्रकरण
- खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा
- ‘गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका झाल्यास, त्याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहिल’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

