मुंबई : राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेने दिवाळीनिमित्त फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली आहे. त्यानुसार मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असून भावा-बहिणींनाही भाऊबीज घरातूनच ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
आता यावर्षी ऑनलाईन भाऊबीज बघायला मिळणार असून, बहिणीने-भावाला ऑनलाईन ओवाळावे व ऑनलाईनच ओवाळणी घ्यावी असे देखील सुचवले आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर बऱ्याच राज्यात फाटले फोडण्यास बंदी घालण्यात अली आहे. दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मार्केटमध्ये मुंबईकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने आज तातडीने दिवाळी निमित्ताने नियमावली जारी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलण्याची राज्य सरकारची चाल- प्रविण दरेकर
- पुणे पदवीधरसाठी भाजपकडून ‘या’ दिग्गज नेत्याला संधी…
- खबरदार!, यंदा फटाके फोडाल तर पोलीस कारवाई होणार
- ‘आई माझी काळुबाई’चा वाद आता थेट उदयनराजेंच्या दरबारात
- सरकारचे नेमके काय चाललं आहे, हे मराठा समाजालाही कळू द्या?


