Share

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे देखील मुख्यमंत्र्यांनच्या आवाहनाला समर्थन  

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे काल आवाहन केले होते. यावरच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला समर्थन दिले आहे. लतादीदींनी ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना, राज्यातील जनतेला फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. फटाके फोडण्याऐवजी दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा, असे लतादीदी म्हणाल्या.

राज्यात कोरोनामुळे बनलेली भीषण परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. प्रदूषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. त्यामुळे प्रदूषण करणारे फटाके टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. आतापर्यंतचे सर्व सण साधेपणाने साजरे केले. गेले ८ महिने जनतेने जे सहकार्य केले त्याला तोड नाही. या सहकार्यामुळेच आपण तणावमुक्त आहोत. दुसऱ्या लाटेची चिंता आहे. ती येऊ नये यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

‘सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका, रोषणाई करा. आजूबाजूला त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन प्रदूषण होणार नाही असे फटाके वाजवा. पोलीस, महसूल, आरोग्य सेवक, डॉक्टर अत्यंत तणावाखाली जनतेसाठी लढत आहेत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आता आपल्याजवळ मास्कशिवाय दुसरं शस्त्र नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!