Share

न्हावरेतील घटनेचा तपास गांभीर्याने करण्याची आढळराव पाटील यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

पुणे- न्हावरे, ता.शिरूर येथील शेतमजूर महिलेवर अज्ञात गुन्हेगाराकडून झालेल्या हल्ल्यात त्या महिलेचा एक डोळा काढण्याची व दुसरा डोळा निकामी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेचा तपास पोलीस यंत्रणेने गांभीर्याने करावा, तसेच तपासाकामी ग्रामस्थांनी देखील पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

न्हावरे येथे  माजी खासदार आढळराव यांनी पिडीतेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. यावेळी आढळराव यांनी  कुटुंबियांना उपचारासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, या घटनेच्या संदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्याशी बोललो असून, घडलेली सर्व घटना त्यांच्या कानावर घातली आहे. तसेच चित्रे कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, जिल्हा परिषदेचेमाजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे, जिल्हा सल्लागार अनिल काशिद, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार,दत्ता गिलबिले, आनंद हजारे, अनिल पवार, अल्पसंख्याक महिला आघाडीच्या रेश्मा पठाण, उपाध्यक्षा अंजना राऊत,दीपक कोकडे, शहाजी जाधव, नगरसेवक संजय देशमुख, किरण नवले, नाना सुर्यवंशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा मीनाक्षी कोरेकर, सुमन वाळुज, मंगल पवार, जनाबाई ठोंबरे, वैशाली चव्हाण उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!