Share

खडसे माघार घ्या, अन्यथा राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील; ब्राह्मण महासंघाचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

पुणे :  भाजपला राम राम ठोकल्यानंतर आता एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या खडसे यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.

मात्र, या टीकेनंतर आता खडसेंवर ब्राह्मण समाज नाराज झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी ब्राह्मण समाजासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेतले नाही तर पुण्यात त्यांचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ब्राह्मण महासंघाकडून देण्यात आला आहे.

दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी. याचे ज्ञान खडसे यांना नसावे याचे आश्चर्य वाटतं. खडसे यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना याचा जाब विचारण्यात येईल, असे आनंद दवे यांनी म्हटले होते. यासंदर्भात आज ब्राह्मण महासंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आमदारांना निवेदनही देण्यात येणार आहे.

एकनाथ खडसेंनी या वक्त्याववरुन माघार घेत समाजाप्रती दिलगिरी व्यक्त केली नाही, तर पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील, असा आक्रमक इशारा देखील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला आहे. त्यामुळे आता येत्या काळात नुकतेच राष्ट्रवादीवासी झालेले एकनाथ खडसे या वक्तव्यावरून अडचणीत येणार की दिलगिरी व्यक्त करून नाराजी दूर करणार हे महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!