Share

‘युवकांनो, स्वच्छ राजकारणासाठी ‘वंचित’मध्ये सक्रिय व्हा’

Published On: 

बीड : स्वच्छ भारताबरोबर स्वच्छ राजकारण व समाजकारण ही आता काळाची गरज आहे. तरुण पिढीमध्ये इतिहास घडविण्याची शक्ती आहे किंवा त्यांच्यात ती क्षमता असते. त्यासाठी अधिकधिक युवकांनी वंचित बहुजन युवा आघाडीत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडी युवाच्या वतीने बीड जिल्ह्यात युवा सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तालुका स्तरावर बैठका घेऊन सदस्य जोडणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

बीड, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर, आष्टी, परळी, आंबेजोगाई, केज, वडवणी, धारूर, या ठिकाणी वंचितमध्ये काम करत असलेल्या युवकांना जोडण्याचे काम हाती घेण्यात आला आहे. राजकारणात अनेक अडथळे येतात. मात्र, सकारात्मक दृष्टिकोण, वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, कामाविषयी निष्ठा असेल तर सर्व संकटांवर मात करता येते हे युवक दाखवून देऊ शकतात. राष्ट्रनिर्माण, राष्ट्रविकास, सामाजिक व राजकीय विकासाची मोठी जबाबदारी ही युवकांवर असते. स्वामी विवेकानंद यांच्या युवकांच्या विचारांवरून प्रेरणा घेत वंचित बहुजन युवा आघाडी ही कार्यरत असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले आहे.

समाजात राजकीय बदल घडविण्यासाठी युवकांनी सक्षम प्रयत्न केल्यास देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात सत्ता परिवर्तन होईल. यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजातील युवकांनी स्वच्छ भारताबरोबर स्वच्छ व पारदर्शक राजकारणासाठी, समाज कारणासाठी तरुण युवकांनी राजकारणात यावे असं आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!