Share

महामंडळासाठी मुख्यमंत्र्यांना ‘एक लाख पत्र पाठवा’ आंदोलन

Published On: 

बीड : ब्राह्मण समाजाच्या प्रगतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. यासह अन्य मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ब्राह्मण समाजाकडून पाठवण्यात येत आहे. २६ जानेवारीपासून सुरू असलेल्या या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी, केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे, पुरोहित बांधवाना मानधन सुरू करण्यात यावे आदी मागण्यांसाठी ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. अनेक निवेदने सरकार दरबारी लाल बस्त्यात खितपत पडली आहेत.

या मागण्यांचे शासनाला स्मरण करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कमीत कमी एक लक्ष पत्र पाठवून समाजाच्या मागण्या तत्काळ मान्य करून समाजाला न्याय देण्याची विनंती करण्यात येत आहे. पत्र पाठवा आंदोलनाची सुरुवात बीड जिल्ह्यातील केज येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!