Share

राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे अधिवेशन सुरु होण्याआधी शरद पवारांच्या भेटीला

Published On: 

मुंबई : राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त सचिव असलेले सीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. कुंटे हे १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. कुंटे यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले. सीताराम कुंटे हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून प्रशासनावर त्यांची मोठी पकड आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार २८ तारखेला निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदावर कुणाची वर्णी लागते याची चर्चा मंत्रालय आणि प्रशासनात होती. अखेर या पदासाठी राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.

मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर सीताराम कुंटे यांचे आजपासून सुरु होणारे अधिवेशन हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशन सुरु होण्याच्या आधी कुंटे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुंटे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. विरोधीपक्ष आक्रमक झाले असतानाच मुख्य सचिवांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, मुख्य सचिव पदासाठी कुंटे यांच्या बरोबर प्रवीणसिंह परदेशी यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा होती. मात्र प्रवीणसिंह परदेशी मुंबई महापालिका आयुक्त पदावर असताना त्यांचे राज्याचे मुख्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फारसे न जमल्याने तसंच परदेशी हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे अतिशय निकटवर्तीय आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव राहिल्याने परदेशी यांच्यापेक्षा कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!