Share

‘आप’चे अनोखे आंदोलन, नाल्यावर पालिकेचा दशक्रिया करून पिंडदान

Published On: 

बीड : बीड नगर परिषदेने हलगर्जीपणाचा कळस गाठला असून यामुळे शहराची वाट लागत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. त्यामुळे बीड शहराच्या स्वच्छतेसाठी आपने पुढाकार घेतला आहे. दर आठवड्याला पक्षाकडून शहरात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. रविवारी या मोहिमेला दहा आठवडे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नगर परिषदेच्या हलगर्जीपणाचा नाल्याच्या बाजूला दशक्रिया विधी घातला.

आपने आरोप केला आहे की, पालिका स्वच्छतेच्या नावाखाली फक्त घोषणा करते. मात्र, वास्तवात कसलीही स्वच्छता केली जात नाही. बीडकरांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह मुख्याधिकारी व नगरसेवकांना याचे काही एक देणेघेणे नाही. आम आदमी पार्टीने सलग १० आठवडे स्वच्छता अभियान राबवत ठिकठिकाणी नगर परिषदेच्या हलगर्जीपणाला, खोटारडेपणाला उघडे पाडलेले आहे.

यानंतर गांधीनगर येथे स्वच्छता मोहीम राबवत विधिवत नगर परिषदेच्या नाकर्तेपणाचा दशक्रिया विधी पिंडदान करत घातला गेला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक बजरंग येडे, सचिव रामधन जमाले, शहराध्यक्ष सय्यद सादेक, संघटनमंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत, सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे, इम्रान शाह व इतरांची उपस्थिती होती.

नगरपालिका प्रशासनाने शहराच्या स्वच्छतेकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले नाही तर वर्षभर आपकडून प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहीम राबवून वर्षपूर्ती झाल्यानंतर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे वर्षश्राद्ध घालून आंदोलन करू असे आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!