Share

बीड जिल्ह्यातून राम मंदिरासाठी १ कोटी ४३ लाखांची देणगी

Published On: 

🕒 1 min read

बीड : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर निर्माण निधी अभियान बीड जिल्हा पश्चिम भागात राबविण्यात आले. या सात तालुक्यांतील एकूण ८४७ गावांपैकी ८४१ गावांपर्यंत एका महिन्याच्या कालावधीत हे अभियान पूर्ण झाले. यात १ लाख ५१ हजार ३२६ कुटुंबांनी सहभाग घेतला. त्यातून बीड जिल्हा पश्चिम एक कोटी ४३ लाख ३ हजार ७६८ एकूण निधी संकलित झाला आहे. तो मंदिर निर्माण ट्रस्टकडे पाठवण्यात आलाय.

निधी अभियान यशस्वितेसाठी ९ हजार ५४१ रामसेवकांनी सहभाग नोंदवला. हे अभियान मकरसंक्रांती १५ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बीड पश्चिम जिल्ह्यात राबवले. प्रत्येकाला रामलल्लाच्या मंदिर निर्माणात सहभाग घेता यावा, केवळ राम भक्ताच्या साह्याने सहयोगाने समर्पणातून हे मंदिर निर्माण व्हावे, या राष्ट्रीयत्वाच्या विचाराने ट्रस्टच्या वतीने सर्व साधुसंतांनी आवाहन करून निधी समर्पण अभियान राबवण्याचे ठरवले होते. याला देश-विदेशातून सर्व भक्तांनी मोठा सहभाग दिलेला आहे, अशी माहती समितीचे अध्यक्ष महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी दिली.

केवळ निधी जमा करणे हा उद्देश नव्हताच. यानिमित्ताने जन मनातील प्रभू श्रीराम जागृत करून सक्षम रामराज्यासाठी हे अभियान गाव वस्ती, प्रत्येक कुटुंब सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचे कामही रामसेवकांनी केले. हे अभियान मर्यादित कालावधीत करण्याचेही ट्रस्टने ठरवले होते. संपूर्ण हिशोब पूर्ण करून, सर्व समर्पण निधी अयोध्या मंदिर निर्माण ट्रस्टकडे वर्ग करण्यात आला. यानंतर हा निधी संकलन समिती आणि अभियान विसर्जित केले जाणार असल्याचे महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!