Share

खाजून आवधान! जामीन मिळताच फिर्यादीच्या घरासमोर फोडले फटाके, पुन्हा ॲट्रॉसिटी दाखल

Published On: 

बीड : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या घरासमोर तोफा, फटाके वाजवल्याचा प्रकार समोर आला आहे. केज तालुक्यातील जानेगाव येथे ही घटना घडली. या प्रकारामुळे पोलिस ठाण्याकडे निघालेल्या फिर्यादीला आरोपीने शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिसांत त्याच आरोपी विरोधात पुन्हा एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आरोपीला न्यायालयाने दिलासा देऊनही खाजून आवधान आणल्याची चर्चा परिसरात होत आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, जानेगाव येथील सरपंच आम्रपाली ओव्हाळ यांचे पती विलास ओव्हाळ हे २ ऑक्टोबर २०२० रोजी केज येथून गावाकडे जात होते. यावेळी अशोक फुलचंद शिंदे व इतर दोघांनी रस्त्यात अडवून जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली होती. याप्रकरणी शिंदेसह दोघांविरुद्ध युसूफवडगावमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अशोक शिंदे याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर अशोक शिंदे याने २६ फेब्रुवारी रात्री ८.३० वाजता फिर्यादी विलास ओव्हाळ यांच्या वस्तीत जाऊन दोन तोफा वाजवल्या. मात्र तोफा वाजवून समाधान न झालेल्या अशोक शिंदे याने काही वेळाने ओव्हाळ यांच्या घराच्या अंगणात जाऊन अॅटमबॉम्ब वाजवला.

त्यामुळे ओव्हाळ यांच्या कुटुंबात आणखी भीतीचे वातावरण पसरल्याने विलास ओव्हाळ हे त्यांचा भाऊ हनुमंत याला सोबत घेऊन युसूफवडगाव पोलिस ठाण्याकडे दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी अशोक शिंदे याने त्यांना मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर अशोक शिंदेविरोधात आणखीन एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!