अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- निळवंडेच्या कालव्यांचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. तुमचे मामा राज्याचे जलसंधारण मंत्री आहेत. जलसंधारण मंत्री जयंत पाटील मामांकडून तेवढे निळवंडे कालव्याचे काम करून घ्या. तुमची पाठ मी थोपटीन, असे आवाहन भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिले आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एका कार्यक्रमात माजी मंत्री कर्डिले बोलत होते.
शिवाजी कर्डिले पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात विजेचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या वीजबिला प्रश्नी आंदोलने सुरू आहेत. विज मंत्र्यांनी त्या प्रश्नांचा आधी निपटारा करावा. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत.
बिले दुरुस्त करून द्यावेत. तसेच नगर जिल्ह्यातील बनावट डिझेल प्रकरणी मुख्य आरोपीला पाठिशी घालण्याचे काम मंत्री तनपुरे यांनी केले आहे. अनेक वर्षांपासून निळवंडेच्या कालव्यांचे काम रखडले आहे. तुमचे मामा जलसंधारणमंत्री आहेत. त्यांच्याकडून हे काम करून घ्या. असे झाल्यास मी तुमची पाठ थोपटीन, असे आव्हान कर्डिले यांनी तनपुरे यांना दिले आहे.
मला गुंड म्हणणारे स्वतः महागुंड आहेत. गुंडांना पाठिशी घालणारे महागुंड ठरले आहेत. त्यांनी आमच्यावर आरोप करण्याआधी स्वतःच्या चार बोटांकडे पहावे. स्वतः वीजमंत्री असताना जिल्ह्यात विजेचे अनेक प्रश्न आहेत. किमान आपल्या जिल्ह्यातील विजेचा प्रश्न त्यांनी सुरळीत करावा, अशी टीका शिवाजी कर्डिले यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’; मनसेचा हल्लाबोल
- योग्य वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर बोलणार – उदयनराजे
- कोरोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : उद्धव ठाकरे
- ‘ज्या राज्याचा मुख्यमंत्री घरीच बसून असतो, ते राज्य नेहमीच धोक्याच्या वळणावर असते’
- शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका


