🕒 1 min read
मुंबई : दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून याविषयी भाष्य केले आहे. तसेच ‘चिनी विषाणू’ म्हटल्या गेलेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला आजारपण आणि आर्थिक अरिष्टाच्या खड्ड्यात ढकलले खरे, पण खुद्द चीनची अवस्था तरी वेगळी कुठे आहे? चीनदेखील कोरोनाच्या ‘खड्ड्या’तच अडकलेला आहे. त्या देशाच्या मानगुटीवर बसलेले कोरोनाचे भूत उतरायला तयार नाही. अधूनमधून ते डोके वर काढतच आहे. ‘स्टील्थ ओमायक्रोन’च्या साथीमुळे तेथील तीन प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये लादलेले संपूर्ण लॉक डाऊन त्याचाच पुरावा आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘हिंदुस्थानात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर जवळ जवळ ओसरला आहे. मात्र ज्या चीनमधून कोरोना महामारी संपूर्ण जगात पसरली, त्या चीनमध्ये या रोगाने पुन्हा थैमान घातले आहे. ‘स्टील्थ ओमायक्रोन’ या कोरोनाच्या विषाणूमुळे चीनमधील शेन्झेन, युचेंग आणि जिलिंग प्रांताची राजधानी चांगचून या शहरांमध्ये १०० टक्के लॉक डाऊन करण्यात आले आहे. मागील २४ तासांत चीनमध्ये सापडलेले कोरोना रुग्ण आजपर्यंतच्या काळातील सर्वाधिक आहेत. आपल्याकडे मध्यंतरी ज्या ओमायक्रोन या कोरोना विषाणूच्या उपप्रकाराने तिसरी लाट आणली होती, त्याच ‘बीए-2′ (स्टील्थ ओमायक्रोन) या विषाणूने चीनमध्ये मोठा संसर्ग पसरविला आहे. ”चीन सध्या कठीण काळातून जात आहे” असे वर्णन यासंदर्भात तेथील साथरोग तज्ञ झेंग वेनहोंग यांनी केले आहे. त्यावरूनही चीनमधील सध्याच्या कोरोना संकटाची कल्पना येते. फक्त चीनमध्येच नाही, तर शेजारच्या हाँगकाँग आणि दक्षिण कोरियातही याच विषाणूने हातपाय पसरले आहेत.’
दरम्यान, नेदरलॅण्ड, डेन्मार्कमध्येही असे काही नवीन विषाणू सापडले आहेत. त्यात आता चीनसह हाँगकाँग, द. कोरियामध्ये ‘स्टील्थ ओमायक्रोन’ने धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशात तिसऱया लाटेचाही तडाखा मोठाच होता, पण लसीकरणामुळे ती जीवघेणी ठरली नव्हती. मात्र जगातील अनेक देशांमध्ये अजूनही लसीकरणाचा वेग कमीच आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणि प्रसार सुरूच आहे. चीनसारख्या कोरोनाचा ‘निर्माता’ म्हटल्या जाणाऱ्या देशातही कोरोना संपलेला नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- देशात पुन्हा कोरोनाची धास्ती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
- नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
- IPL 2022: जिमी नीशमने आयपीएलच्या नवीन नियमांबाबत दर्शवली नाराजी; चाहत्यांनी ट्विटरवर झापले
- “काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरेंना माहिती, नुसतं टॅक्स-फ्री…”, संजय राऊतांची टीका
- वीज जोडणीची अंमलबजावणी सुरु; महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ चा आदेश जारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
