Share

“…तर परीक्षा केंद्र कायमचे रद्द केले जाणार”, वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या राज्यात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. यातच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणे आढळून आल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार आहे. तसेच कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही अशी घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

“१५ मार्चला दहावीच्या मराठीची परीक्षा होती. कोरोना स्थिती पाहता आपण प्रत्येक शाळेला परीक्षा केंद्र केलं. ज्या शाळेत गैरप्रकार सुरु असल्याचे दिसून आले त्यांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे असे काही प्रकार होत असतील तर परीक्षे केंद्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यातील अहमदनर आणि औरंगाबादमध्ये पेपरफुटीचे प्रकरण आढळून आलेल्या शाळांची मान्यता काढून घेण्यात आल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!