अमरावती : राज्यात सध्या मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसावरून जोरदार राजकारण होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. भांगे काढले नाही तर मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. अशा वेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. राणा दाम्पत्य हे आज मुंबईत दाखल झाले आहे. उद्या सकाळी ९ वाजता कोणत्याही परिस्थितीत मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणारच, असं खुलं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांना दिलं.
रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या आव्हानावर बोलताना प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जहरी टीका केली आहे. “निवडणुकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता आता तुमचा बाप बदलला आहे,” अशा जहरी शब्दात बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.
राणा दाम्पत्यावर बच्चू कडू यांनी जहरी टीका केली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “निवडणुकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता आता तुमचा बाप बदलला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन राणा निवडून आले आहेत, हे विसरू नका. राणा दाम्पत्य हे विकासाचा मुद्दा सोडत आहेत. प्रहार संघटना शिवसेनेबाबत आहे. आम्ही शिवसैनिकांसोबत आहोत. रवी राणा यांची तेवढी उंची नाही. ते मातोश्रीवर जाणार नाहीत,” असा दावा बच्चू कडू यांनी केला.
दरम्यान आम्ही कोणत्याही परिस्थितीत मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचणारच, उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असे राणा दाम्पत्य यांनी ठरवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :

