Share

IPL 2022 : आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात टक्कर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये आज ३४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी हा सामना प्रथम पुण्यात होणार होता. परंतु दिल्ली संघातील खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्यामुळे हा सामना वानखेडे येथे हलविण्यात आला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने गेल्या सामन्यात विजयाची नोंद केली आहे. या सामन्यातही ती विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी उतरेल. आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी चांगली झाली आहे. रॉयल्स संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचाही पराभव केला.

आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने दमदार सुरुवात केली. पण काही सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची गती बिघडली. गेल्या सामन्यात ऋषभ पंतच्या संघाला पंजाब किंग्जविरुद्ध शानदार विजयाची नोंद करण्यात यश आले होते. पॉईंट टेबलवर नजर टाकली तर दिल्लीचा संघ ६ गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. १५ व्या मोसमात दिल्लीने ६ सामने खेळले आहेत ज्यात ३ जिंकले आहेत आणि ३ हरले आहेत.

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. संघाचा स्टार फलंदाज जोस बटलरने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत २ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत. त्याच्याकडे सध्या ऑरेंज कॅप आहे. त्याच्याशिवाय संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलही उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या सामन्यात त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हॅट्ट्रिक केली होती. टेबल पॉईंट पाहता राजस्थानचा संघ ८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसनच्या संघाने आयपीएल २०२२ मध्ये ६ सामने खेळले आहेत ज्यात ४ जिंकले आहेत आणि २ हरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!