Share

अज्ञात वाहनाच्या धडकेत भोकरदन येथील तरुण मृत्यूमुखी

Published On: 

औरंगाबाद : शहर व जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. यात रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच चालले आहे. रात्री प्रवास करणारे बहूतेक चालक हे भरधाव वाहन चालवतात असे प्रामुख्याने दिसून येते. अशाच एका अपघातात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास दुचाकीवरील एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.

भोकरदन तालुक्यातील आडगाव भौंबे येथील अतुल अशोक आडगावकर व काशिनाथ भोंबे हे सिल्लोड येथून दुचाकीवर आडगाव येथे जात होते. डोंगरगाव फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अतुल व काशिनाथ दोघेही गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना त्वारित सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमीक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान अतूल आडगावकर याचा मृत्यू झाला आहे. तर काशिनाथ भोंबे यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास सिल्लोड पोलिस करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!