Share

‘भ्रष्टाचार हा जगण्याचा आणि यंत्रणेचाच भाग; तुम्ही-आम्ही काय करणार ?’

Published On: 

मुंबई : सध्या राज्यात पूजा चव्हाण प्रकरणामध्ये संथ तपास कार्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. तर विरोधकांकडून देखील पोलिसांवर टीका करण्यात येत आहे. यामध्ये आता पोलिसांच्या कामगिरीवर होणाऱ्या टीकेला आणखी दुजोरा देणारा घटना घडली. नागपूर शहर व नागपूर परिक्षेत्रातील कायद व सुव्यवस्थेचा आढावा घेत आसताना राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. ‘भ्रष्टाचार हा व्यवस्थेचाच भाग झाला आहे. पोलिस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या बघता अन्य विभागाच्या तुलनेत लाच प्रकरणात पोलिस विभागात अटक होणाऱ्यांची टक्केवारी ही कमीच आहे,’

नगराळे यांच्या या विधानाने उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून भ्रष्टाचार आणि राजकारणाचा देखील किती घनिष्ठ संबंध आहे. याची अनेक उदाहरणे देत राजकीय पक्ष आणि सरकारी यंत्रणा ही भ्रष्टाचाराशिवाय चालतच नसल्याचे म्हटले आहे.

‘सत्तेतून पैसा, पैशातून पुनः पुन्हा सत्ता या चक्रात आज सगळेच सापडले आहेत व पैसा जमविण्याचा मार्ग यंत्रणेतले अधिकारीच दाखवत असतात. सार्वजनिक बँकांची लूट, चौथा स्तंभ मानणारे ‘मीडिया’ त्यांच्या टीआरपीसाठी कसा भ्रष्टाचार करतात हे समोर आले, पण या घोटाळेबाज लोकांना राजकीय पक्ष सरळ पाठिंबा देतात. गुंड व राजकीय कार्यकर्ते वर्गण्या गोळा करतात तेव्हा त्यांना खंडणीखोर म्हणतात; पण राजकारणी, अधिकारी व ठेकेदारांचे त्रिकूट एकत्र येऊन लूट करतात तेव्हा ती सोय म्हणून पाहिले जाते. निवडणूक हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे, असे श्री. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत. ही भ्रष्ट गंगोत्री साफ करणारे एकच शेषन निर्माण झाले. बाकी सब घोडे बारा टके! भ्रष्टाचार हा जगण्याचा आणि यंत्रणेचाच भाग झाला. तुम्ही-आम्ही काय करणार ? असा प्रश्न आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!