मुंबई: नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शुक्रवारी एका उच्चशिक्षित महिलेने त्यांच्या विरुद्ध छळवणूकीसह गंभीर आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
यामध्ये या महिलेने ‘ते माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत,’ त्याचबरोबर आपल्या मागे माणसे लावणे, हेरगिरी करणे, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखविणे यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर या महिलेने . ‘२०१३ मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि सन २०१८मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता; मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही,’ असे या महिलेने याचिकेत म्हटले आहे.
पुढे या महिलेने ‘आपण या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दाद मागितली मात्र न्याय मिळू शकला नाही अखेर राष्ट्रीय महिला आयोगाने यामध्ये एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, तरीही बीकेसी-परिमंडळ ८च्या पोलिस उपायुक्तांनी त्याची आजतागायत दखल घेतली नाही. म्हणून नाईलाजास्तव उच्च न्यायालयात दाद मागावी लागत आहे,’ असे सांगितले. तर आता अॅड. आभा सिंग यांनी न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे हा अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने चार मार्चला पुढील सुनावणीचे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दीड वर्षानंतर अंगारकी चतुर्थीचा योग; मात्र, राजुरेश्वराचे मंदिर राहणार बंद
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
- मराठा आरक्षण आंदोलनाचा ३९ वा दिवस; आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
- ‘तुम्ही नोकरी कसे करता तेच पाहतो’ म्हणून पोलिसांवर चाकुहल्ला; छावणीतील घटना
- मोठी बातमी : राज्य बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

